चर्चेतली बातमी : ईडीच्या चौकशीतील प्रफुल्ल पटेल यांच्यावर भाजपचा निशाणा, पटेल यांच्याकडून मात्र ‘मिर्ची ‘ संबंधांचा इन्कार

राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीत मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्याशी झालेल्या कथित लँड डीलची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) सध्या कसून चौकशी सुरू असतानाच भाजपने आज राष्ट्रवादीवर प्रश्नांची सरबत्ती केली. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी जोडत पटेल आणि मिर्ची यांच्यात केवळ लँड डीलच झाले की त्यापुढेही काही होते?, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात संबित पात्रा यांनी मुंबईत येऊन या विषयावर पत्रकार घेणे आणि याच काळात या डीलचा गौप्यस्फोट वृत्तवाहिन्यांवरून करणे यामागे कोण असेल यावरही या निमित्ताने चर्चा होत आहे. यावर बोलताना पात्रा यांनी म्हटले आहे कि , ज्या बातम्या झळकत आहेत त्या पाहता राष्ट्रवादी काँग्रेस आणि डी कंपनीचं कनेक्शन होतं, हे स्पष्ट होत आहे. जी कागदपत्रं समोर आली आहेत ती पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीसोबत राष्ट्रवादीचे नेमके काय संबंध आहेत, याची माहिती देशापुढे यायला हवी. प्रतिज्ञापत्रावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी असून त्यावरून डी कंपनीशी त्यांचं काही ना काही कनेक्शन आहे, हे स्पष्ट होत असल्याचेही पात्रा म्हणाले. हे केवळ एक प्रॉपर्टी डील होते का? की त्यापुढेही काही होते?, हे डील २००४ मध्ये सुरू झाले आणि २००७ मध्ये पूर्ण झाले. ते पाहता यामागे नक्कीच काही ना काही मोठे कारस्थान असणार. महाराष्ट्र आणि देशाच्या सुरक्षेशी हा खेळ होता का?, असा सवालच पात्रा यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे कुटुंबीय प्रवर्तक असलेली कंपनी व मिर्ची नावाने कुख्यात राहिलेल्या इक्बाल मेमनमध्ये आर्थिक डील झाले होते. मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मिर्चीमध्ये झालेल्या या लीगल अॅग्रीमेंटची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधील या डीलनुसार मिर्चीने मिलेनियम डेव्हलपर्सला वरळीत नेहरू प्लॅनेटोरियमच्या समोर मोक्याच्या ठिकाणी प्लॉट दिला होता. या प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली कमर्शियल व रेसिडेन्शियल इमारत उभी केली आहे. सीजे हाऊस असे या इमारतीचे नाव आहे. डीलनुसार या इमारतीतील दोन मजले मेमन कुटुंबाला देण्यात आले आहेत. ईडीतील सूत्रांच्या मते या दोन मजल्यांची सध्याची किंमत २०० कोटींच्या जवळपास असून या संपूर्ण प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
आरोपानुसार ‘मिर्ची’ नावाने कुख्यात दिवंगत इकबाल मेमन याच्याशी पटेल यांच्या कुटुंबाच्या कंपनीने आर्थिक व्यवहार केला होता. पटेल कुटुंबाची मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ‘मिर्ची’मध्ये झालेल्या कायदेशीर कराराचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे, पटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीकडून ‘मिर्ची’ ला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीतील नेहरू तारांगणच्या समोर प्राइम लोकेशनला आहे. याच प्लॉटवर मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली रहिवासी आणि व्यावसायिक इमारत बांधली. या इमारतीचे नाव ‘सीजे हाउस’ असे आहे.
या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांत मुंबईपासून ते बेंगळुरूपर्यंत ११ ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. यात छाप्यांमध्ये मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला आहे. डिजिटल पुरावे, ईमेल आणि कागदपत्रे जप्त केल्यानंतर ईडीने १८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. इकबाल मेमम म्हणजे ‘मिर्ची’ची पत्नी हजरा मेमन यांच्या नावे असलेला प्लॉट पटेल कुटुंबाच्या कंपनीच्या नावे करण्यात आला, यासंबंधिची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. हा प्लॉट रिडेव्हलपमेंटशी संबंधित दोन्ही पक्षांमध्ये करार झाला. २००६-०७मध्ये झालेल्या या डीलनुसार सीजे हाउस इमारतीमधील दोन मजले मेमन कुटुंबाला देण्यात आले. इमारतीच्या या दोन मजल्यांची किंमत २०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे भागधारक आहेत. यामुळे चौकशीसाठी पटेल कुटुंबीयांना बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.
इमारतीचे दोन मजले मेमन कुटुंबाला का दिले? तसंच या डील शिवाय इतर कुठले आर्थिक व्यवहार झाले का? असे प्रश्न चौकशीत केले जातील, असं ईडीतील सूत्राने सांगितलं. मात्र दाऊदचा साथीदार ‘मिर्ची’ याच्या कुटुंबाशी कुठलाही संबंध नाही. तसंच प्रफुल्ल पटेलांवरील आरोप धक्कादायक असून त्यांना गोवण्यात आल्याचं पेटल कुटुंबियांचे म्हणणे आहे. प्रफुल्ल पटेल आणि पटेल कुटुंबातील कुणीही ‘मिर्ची’च्या कुटुंबीयांशी कुठलाही आर्थिक व्यवहार केलेला नाही. ह्या आरोपांनी आम्हाला धक्का बसला आहे, असं पटेल कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं.