Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेत “चंपा”ची “चंपी ” होणार असल्याचे राज ठाकरेंचे भाकीत

Spread the love

‘कोल्हापूर, सांगलीत पूर आला आणि तिथला सरकारमधील एक मंत्री कोथरूडपर्यंत वाहत आला’ असा सणसणीत टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. पाटलांचा उल्लेख ‘चंपा’ असा गर्दीतून झाल्यानंतर या चंपाची चंपी मनसेचा येथला उमेदवार करेल, असेही राज म्हणाले. भाजपपुढे शिवसेना लाचार झाली आहे, असा हल्लाही राज यांनी चढवला.

पुणे विभागातील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांची पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले मंडईत सभा झाली. या सभेत बोलताना राज यांनी भाजप व शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. कोल्हापूर, सांगलीत पूर आला. कोकणालाही पुराचा फटका बसला. राज्यात इतकी भीषण स्थिती असताना व लोकांची घरे वाहून जात असताना सरकार मात्र तेव्हा प्रचारात मग्न होते, असे सांगत राज यांनी कोथरूडमधून निवडणूक लढत असलेल्या कोल्हापूरकर चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले.

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची नक्कल करत शिवसेनेवर शरसंधान केले. पुण्यात शिवसेना नावाचं काही दिसतच नाहीय. भाजपवाले रोज त्यांची इज्जत काढताहेत, असे नमूद करत ‘आमची इतकी वर्षे सडली पण आता यापुढे तसं होणार नाही. राज्यात आम्ही एकहाती भगवा फडकवू’, या उद्धव यांच्या घोषणेचे काय झाले, असा सवाल राज यांनी केला. नाशिक, पुण्यासारख्या शहरांत शिवसेनेला भाजप एकही जागा सोडत नाही. काय करून ठेवलंय हे शिवसेनेचं. शिवसेना लाचार झालीय. बाळासाहेब असते तर हे करण्याची कुणाची हिम्मत झाली नसती. ते कशाला, मी असतो तरीही भाजपवाल्यांची हिम्मत झाली नसती, असे राज म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!