Aurangabad : युथ आयकॉन कन्हैया कुमार यांची अभय टाकसाळ यांच्या प्रचारासाठी जाहीरसभा

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व डाव्या लोकशाही आघाडीचे संघर्षशील लोकप्रिय उमेदवार कॉ. ऍड. अभय टाकसाळ हे औरंगाबाद-मध्य मधून निवडणुक लढवत आहेत.त्यांच्या प्रचारार्थ युथ आयकॉन डॉ. कन्हैयाकुमार यांची प्रचंड जाहीर सभा होणार आहे.
गेल्या २५ वर्षांपासून विद्यार्थी युवक कामगार कष्टकरी तसेच शहरातील पाणी प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, मोकाट कुत्र्याचा प्रश्न, रस्त्यातील खड्डयांच्या प्रश्न यासह अनेक प्रश्नांना घेऊन सतत आंदोलन करणारे उमेदवार कॉ अभय टाकसाळ हे नाव शहराला नवीन नाही! त्यांच्या प्रचारार्थ जेएनयु दिल्ली येथील युवानेता डॉ कन्हैया कुमार यांची प्रचार सभा आयोजित केली आहे.
डॉ. कन्हैयाकुमार यांची सभा गुरुवार दि १७ ऑक्टो.२०१९, सायंकाळी ५.०० वा, आमखास मैदान येथे होईल. यावेळी भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ.भालचंद्र कांगो, उमेदवार अैड.अभय टाकसाळ, डॉ राम बाहेती व डाव्याआघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
यासभेसाठी विद्यार्थी, युवक, महिलांनी, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कॉ मनोहर टाकसाळ, कॉ अशफाक सलामी, कॉ भास्कर लहाने, कॉ तारा बनसोडे,कॉ मधुकर खिल्लारे, कॉ वसुधा कल्याणकर, शाखासचिव मनीषा भोळे, अनिता हिवराळे, सुभाष साबळे, प्रवीण घाटविसावे, प्रकाश बनसोड, भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी संघटनेचे किरणराज पंडित AISFचे ऍड अय्यास शेख, संग्राम कोरडे, AIYFचे विकास गायकवाड, सुभाष गायकवाड यांनी केले आहे