एकाच वेळी महिलेने दिला पाच बालकांना जन्म , एकाच मृत्यू चार सुखरूप

एखाद्या महिलेला जुळे किंवा तिळे होणे तशी सर्वसाधारण बाब आहे परंतु राजस्थानच्या जयपूरमधील एका महिलेने एकाचवेळी पाच बालकांना जन्म दिला आहे. एका नवजात बालकाचा जन्मता:च मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, तीन नवजात बालकांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली तर एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
जयपूरमधील सांगानेर येथील महिला रुखसाना हिनं जनाना रुग्णालयात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता एकाचवेळी पाच मुलांना जन्म दिला. तिघांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर एका मुलाचा जन्मताच मृत्यू झाला होता. तर एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लता राजौरिया यांनी सांगितलं की, ‘रुखसानाची प्रकृती स्थिर आहे. एका बालकाचा जन्मताच मृत्यू झाला आहे. चार नवजात बालकांना एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यातील एकाचा व्हेंलिलेटरवर ठेवलं आहे.’
महिलेची वेळेआधीच प्रसूती झाल्यानं सर्व बालकांचं वजन कमी आहे. त्यामुळं सर्व नवजात बालकांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यात दोन मुली आणि दोन मुलं आहेत. जन्मताच मृत्यू झालेला नवजात मुलगा होता. सर्व बालकांचे वजन एक ते १.४ किलो होते. वजन कमी असल्यानंच त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.