महाराष्ट्र विधानसभा २०१९ : प्रचाराचा आज सुपर संडे , मोदी, राहुल गांधी , अमित शहा , पवार , आंबेडकर , राज ठाकरे यांच्या सभा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाच्या सुपर संडे निमित्त आज महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनी आजचा रविवार गाजणार आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर , सुजात आंबेडकर , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सभा होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज दोन सभा होणार आहेत. एक दुपारी १२ वाजता जळगावमध्ये दुसरी सभा भंडाऱ्यातील साकोळीमध्ये होणार आहे. तर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज ४ सभा होणार आहेत. पहिली सभा कोल्हापुरात होणार आहे. यानंतर दुसरी सभा साताऱ्यातील कराडमध्ये, तिसरी सभा पुण्यातील शिरूरमध्ये आणि चौथी सभा औरंगाबाद जिल्ह्यातील लासूरमध्ये होणार आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज लातूर जिल्ह्यातील औसामध्ये पहिली सभा घेणार आहेत. यानंतर मुंबईत चांदिवली आणि धारावीमध्ये दोन सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि काँग्रेस अध्यक्षपद सोडल्यानंतर राहुल गांधी प्रथमच प्रचार सभा घेत आहेत. यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही आज चार सभा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेत पहिली सभा होईल. यानंतर जालन्यातील घनसावंगी येथे, जळगाव जिल्ह्यात जामनेर आणि चाळीसगावमध्ये त्यांची सभा होईल.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्यागी दोन सभा होणार आहे. मुंबईत दहिसर आणि मालाडमध्ये या सभा होतील.