३७० अमित शहा यांच्या भाषणातील सामान मुद्दा , देश आणि राज्याच्या विकासासाठी नरेंद्र व देवेंद्र यांची परत जोडी बनविनयचे आवाहन

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात असून काँग्रेस-राष्ट्रवादीवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. शुक्रवारी वाशीममध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ‘आघाडी’च्या धोरणांवर जोरदार टीका केली. काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांनी महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आज प्रगतिपथावर आहे. विकासाच्या गाडीचा वेग असाच कायम ठेवायचा असेल तर देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्रच पाहिजे असंही ते म्हणाले. पाकिस्तान आणि कलम ३७० वर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.
अमित शहा यांनी आपल्या भाषणातील मुद्द्यांमध्ये काँग्रेस ने व्होट बँकेसाठी ३७० हटवलं नाही. शरद पवार व राहुल गांधी हे ३७० शी सहमत आहेत की नाही हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो भारतापासून कोणीही वेगळा करू शकत नाही. भारताचं नेतृत्व सध्या एका मजबूत नेतृत्वाच्या हातात आहे. काँग्रेसला देशाची चिंता नाही तर व्होट बॅंकेची चिंता आहे.राहुल बाबा देशातील प्रत्येक व्यक्ती काश्मीरसाठी जीव द्यायला तयार आहेत हे लक्षात ठेवा. राष्ट्रावादी आणि काँग्रेसचे नेते घुसखोरांना हाकलू देत नाहीत. मात्र मी २०२४ पर्यंत प्रत्येक घुसखोराला हाकलणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं. अजित पवार यांनी ७० हजार कोटी खर्चून मोठा घोटाळा केला त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल.
राज्य शासनाच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले कि , फडणवीस यांनी महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवलं. नरेंद्र व देवेंद्र यांची परत जोडी बनवा. समृद्धी मार्गामुळे वाशिम जिल्ह्याचा मोठा विकास होणार. वाशिममध्ये मध्यवर्ती विद्यापीठास मंजुरी दिली जाणार आहे. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना शास्वत वीज पुरवठा केला. विदर्भातील १६ लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. सर्व कामं आम्ही तुमच्या आशीर्वादामुळे करू शकलो. मोदींनी जगात देशाचं मोठं नाव केलं. मोदी याचं नाही तर विदेशात १२५ कोटी जनतेचं स्वागत होत आहे. फडणवीस यांनी राज्यात सव्वा लाख कोटींची कामं केली आहेत. त्यामुळे आम्हाला मोठ्या मतांनी निवडून द्या.