महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची केली ” शोले ” मधील जेलर आसरानीशी तुलना !!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा प्रचारा दरम्यान निवडणुका कुणासोबत लढायच्या खरंच कळत नाही आहे. आमचे पैलवान तयार आहेत पण पुढे कुणीच नाही. तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत आणि इकडे शरद पवारांची अवस्था तर ‘शोले’ सिनेमातील ‘जेलर’साखी अर्थात ‘आधे इधर जावं आधे उधर जावं बाकी मेरे साथ आव’, अशी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामागे कुणीही नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
गुंतवणुकीबाबत ५ व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. देशातील २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. ३५ लाख रोजगार महाराष्ट्रात तयार झाले असून महाराष्ट्र रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. कुणाला शंका असेल तर केंद्र सरकारची वेबसाईट बघा, असा अजब दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
‘मी उमेदवार निवडून द्या म्हणून सांगायला आलो नाही. उमेदवार तर निवडून येणारच आहेत. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही रेकॉर्ड करणार आहात काय. २४ तारखेला पुन्हा मी येईन आणि तुम्ही रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून दिले नाही तर तुम्हाला त्याचा हिशेब द्यावा लागेल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी चिंचवडमधील मतदारांना एक प्रकारे इशाराच दिला. पुढे ते म्हणाले कि , रेकॉर्ड ब्रेक मतांनीच महायुतीचा उमेदवार निवडून द्याल, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले कि , शिंदे हे द्रष्टे नेते आहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय होणार आहे ते समजले आहे. म्हणूनच सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते, आता आम्ही फार थकलो आहोत, आमच्याने आता काहीही होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण आपण करु. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी होणार की विरोधी पक्ष नेताही त्यांना निवडता येणार नाही. कारण विरोधी पक्ष नेता निवडायचा असेल तर १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतात. पण तेवढ्याही जागा मिळणार नाही ही खात्री पटल्यानेच सुशीलकुमार शिंदे विलिनीकरणाची भाषा करत आहेत असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
आज निवडणूक समोर आहे, मात्र आमच्या समोर विरोधकच नाहीत. लहान मुलाला विचारलं तर तोही सांगतो की महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, माती लावून तयार आहेत आखाड्यात उतरले आहेत. मात्र प्रतिस्पर्धी पक्षाचे पैलवान आखाड्यात उतरायलाच तयार नाहीत. राहुल गांधींना ठाऊक आहे की निवडणूक काँग्रेस हरणार आहे त्यामुळे ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत. तर शरद पवारांची अवस्था शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ असं शरद पवार म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फलटण या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घणाघाती टीका केली.