महाराष्ट्र विधानसभा २०१९ : उद्धव ठाकरे म्हणाले दोन्हीही काँग्रेसचे नेते खाऊन -खाऊन थकले तर बाळासाहेब थोरात साखर चोर !!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी भविष्यवाणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ‘शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस पक्ष थकले आहेत, कदाचित खाऊन-खाऊन थकले असतील, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. संगमनेरमध्ये भाजप-शिवसेनेच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील संगमनेरमध्ये भाजप-शिवसेना युतीची प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेससह प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी उद्धव यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस थकले आहेत. कदाचित खाऊन खाऊन थकले असतील, असं उद्धव म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांच्यवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , तुम्ही स्वतःला बाजी प्रभू म्हणवून घेत असाल पण लोक तुम्हाला साखर चोर म्हणतात . राधाकृष्ण विखे पाटील चान्गले विरोधी पक्ष नेते होते परंतु त्यांच्या लक्षात आले कि , आपण चांगल्या कमला विरोध करतोय म्हणून ते वेळीच भाजपमध्ये आले तुम्हीही सन्मानाने घरी बस तुमचे नेते तिकडे बँकॉकला विश्रांतीसाठी गेले आहेत.