Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभेप्रमाणे राज ठाकरे यांना सभेसाठी मैदान मिळेना

MNS chief Raj Thackeray addresses a press conference at his residence Krishnakunj in Shivaji Park on Tuesday. Express Photo by Prashant Nadkar. 26.06.2018. Mumbai. *** Local Caption *** MNS chief Raj Thackeray addresses a press conference at his residence Krishnakunj in Shivaji Park

Spread the love

विधानसभेच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नऊ ऑक्टोबरच्या सभेसाठी मैदानच मिळत नसल्याने पूर्वीप्रमाणे टिळक चौकातच सभा घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. लोकसभेच्या वेळीही राज ठाकरे यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

राज्यातील  सर्व विधानसभा मतदारसंघातील अर्जांची छाननी शनिवारी झाली. सोमवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर, खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. पुढील आठवड्यापासून विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभांना सुरुवात होणार आहे. रविवारी असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाल्यावर बुधवारी राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र, ठाकरे यांच्या सभेसाठी मध्य वस्तीतील मैदान उपलब्ध होत नसल्याची तक्रार मनसेने केली आहे. ठाकरे यांच्या सभेसाठी शहराच्या मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती; पण परवानगी नाकारण्यात आली आहे. काही संस्थांनी तुमच्या सभेसाठी जागा देता येणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

‘शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सभांसाठी मैदानेच मिळत नाहीत’, असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतील उमेदवार अजय शिंदे यांनी केला आहे. शैक्षणिक संस्थांची मैदाने उपलब्ध होत नसल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे करण्यात आली आहे. कोणतीच मैदाने उपलब्ध होत नसतील, तर पूर्वीप्रमाणे टिळक चौकाची जागा सभेसाठी देण्यात यावी, अशी विनंती मनसेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!