महाराष्ट्र विधानसभा २०१९ : राष्ट्रवादीच्या ४० स्टार प्रचारकांची नावे जाहीर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नवाब मलिक यांसह अनेक नेत्यांचा नावाचा समावेश आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण ४० नेत्यांची नाव आहेत. विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत काल संपल्यानंतर आता राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात विविध प्रचारसभांचे आयोजन केलं आहे.