Aurangabad : बसपा उमेदवारांच्या चाचपणीसाठी आलेले निरीक्षक नामदेव खंदारे यांना मारहाण , पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे झाली सुटका

औरंगाबाद – बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवार चाचपणी करण्यासाठी आलेल्या निरीक्षकाला व त्यांच्या ड्रायव्हरला मुकुंदवाडी भागातील हाॅटेल मधे गुरुवारी सकाळी १०.३० वा. तिकीट नाकारलेल्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.पोलिसांनी पक्ष निरीक्षकाला मारहाण करणार्यांच्या तावडीतून सोडवंत अंदाजे १५ ते २० जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.
नामदेव तुकाराम खंदारे(५४)रा.लोहा नांदेड आणि बालाजी उत्तम वाघमारे असे जखमी इसमांची नावे आहेत.औरंगाबाद जिल्ह्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी बसपाचे जेष्ठ कार्यकर्ते नामदेव खंदारे हे बुधवारी मुंबईहून बसपा पक्ष श्रेष्ठींशी सल्लामसलत करुन औरंगाबादला मुकुंदवाडी भागातील हाॅटेल ए-वन मधे मुक्कामासाठी थांबले होते. गुरुवारी सकाळी १०च्या सुमारास गणेश निकाळजे, राम निकाळजे, भगवान गंगावणे आणि इतर १०ते १५ जणांनी बेदम मारहाण केली.
हा प्रकार हाॅटेल जवळ उपस्थित असलेल्या सत्यजित सावळे यांना दिसताच त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसानी वेळीच धाव घेत नामदेव खंदारे व त्यांचा चालक बालाजी वाघमारेची सुटका केली. खंदारे यांच्या तक्रारी वरुन वरील आरोपींविरुध्द पोलिस निरीक्षक उध्दव जाधव यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच संध्याकाळी गुन्हा दाखल झाला पुढील तपास पीएसआय बांगर करंत आहेत