Aurangabad : एमआयएमचे नासेर सिद्दीक्की, अरूण बोर्डे यांचे अर्ज दाखल, जावेद कुरैशी यांनी भरला अपक्ष म्हणून अर्ज

औरंंंगाबाद : एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासेर सिद्दीक्की व औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार अरूण बोर्डे यांनी शुक्रवारी (दि.४) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एमआयएमच्या जावेद कुरैशी व नगरसेवक सय्यद मतीन यांचे वडील सय्यद रशिद यांनी अपक्ष म्हणून मध्य विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
विधासभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एमआयएमचे औरंगाबाद मध्य व औरंगाबाद पश्चिमच्या उमेदवारांनी वाहन रॅली काढुन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासेर सिद्दीक्की यांनी एमआयएमचे मुख्यालय असलेल्या बुढ्ढीलेन येथील दारूससलाम येथून वाहन रॅली काढुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार अरूण बोर्डे यांनी क्रांतीनगर येथील आपल्या संपर्वâ कार्यालयापासून भव्य वाहन रॅली काढुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अरूण बोर्डे यांच्यासोबत मनपातील विरोधी पक्षनेत्या सरीता बोर्डे, गंगाधर ढगे आदींची उपस्थिती होती.