महाराष्ट्र विधानसभा २०१९ : काँग्रेसची २० उमेदवारांची यादी जाहीर , औरंगाबाद पश्चिममधून रिपाइंचे रमेश गायकवाड तर सिल्लोडहून प्रभाकर पालोदकर यांना उमेदवारी

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस रात्री उशिरा आणखी २० उमेदवारांची यादी जाहीर केलीय. औरंगाबाद पश्चिममधून रिपब्लिकन ऐक्यवादीचे कार्यकर्ते , आणि औरंगाबाद जि .प . चे सदस्य रमेश गायकवाड यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते काँग्रेससोबत होते. सिल्लोडहून अब्दुल सत्तार पक्षातून गेल्यानंतर प्रभाकर पालोदकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान दुसऱ्या यादीत मुख्यत्वेकरून सिद्धाराम म्हेत्रे यांना अक्कलकोटमधून उमेदवारी देण्यात आलीय. तर कुडाळमधून हेमंत कुडाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मतदारसंघ आणि काँग्रेस उमेदवार
१. नंदुरबार – मोहन सिंग
२. शिरपूर – रणजीत पावरा
३. नागपूर पूर्व – पुरुषोत्तम हजारे
४. नागपूर मध्य – ऋषीकेश शेळके
५. अहेरी – दीपक अत्राम
६. परभणी – रवीराज देशमुख
७. सिल्लोड – प्रभाकर पलोदकर
८. औरंगाबाद पश्चिम – रमेश गायकवाड
९. नाशिक मध्य – शाहू खैरे
१०. मालाड पश्चिम – असलम शेख
११. घाटकोपर पश्चिम – मनिषा सुर्यवंशी
१२. कलिना – जॉर्ज अब्राहम
१३. वांद्रे पश्चिम – असिफ जकेरिया
१४. वडाळा – शिवकुमार लाड
१५. भायखळा – मधुकर चव्हाण
१६. अलिबाग – श्रद्धा ठाकूर
१७. अक्कलकोट – सिद्धाराम म्हेत्रे
१८. पंढरपूर – शिवाजीराव कलुंगे
१९. कुडाळ – हेमंत कुडाळकर
२०. कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव