Maharashtra Vidhansabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी 20 उमेदवारांची यादी जाहीर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक उमदेवारांनी आपला अर्ज भरण्यास सुरुवात केली असून उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बेरजेचं राजकारण करत दुसऱ्या पक्षातील काही नेत्यांनाही संधी दिल्याचे दिसत आहे.
जुन्या चेहऱ्यांबरोबर अनेक नव्या चेहऱ्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. हि यादी पुढीलप्रमाणे
जळगाव शहर – अभिषेक पाटील
बाळापूर – संग्राम गुलाबराव गावडे
कारंजा – प्रकाश डहाके
मेळघाट – केवळराम काळे
अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
दिग्रस – मो. तारीक मो. शमी
गंगाखेड – मधूसुदन केंद्रे
कन्नड – संतोष कोल्हे
नांदगाव – पंकज भुजबळ
बागलाण – दीपिका चव्हाण
देवळाली – सरोज अहिरे
कर्जत – सुरेश लाड
खेड आळंदी – दिलीप मोहिते
मावळ – सुनील शेळके
पिंपरी – सुलक्षणा शिलावंत
आष्टी – बाळासाहेब आजबे
म्हाडा – बबनदादा शिंदे
मोहोळ – यशवंत माने
माळशिरस – उत्तमराव जानकर
चंदगड – राजेश पाटील