भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीत

नाशिक जिल्हयातील भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील उपस्थित होते. माणिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. यावेळी पैठणचे भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष दत्तात्रय कोरडे, भानुदास पिसे, अप्पासाहेब गायकवाड यांनीही जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार,आमदार किरण पावसकर, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.