‘मनसे’मध्ये शिवसैनिकांचे उद्यापासून इनकमिंग -पानसे

औरंगाबाद- उद्यापासुन औरंगाबाद सहित नाशिक,धुळे आणि नंदुरबार येथे शिवसैनिकांसह इतर राजकिय पक्षातील महत्वाचे नेते प्रवेश करंत आहेत.आजच मीरा भाईंदर मधे अनेकांनी मनसेमधे प्रवेश केला आहे.अशी माहिती महाराष्र्ट नवनिर्माणसेनेचे वरिष्ठ नेते अभिजित पानसे यांनी दिली.
महाराष्र्ट नवनिर्माण सेना राज्यातील सर्व म्हणजे २८८जागा लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहिर केल्यानंतर सर्वच राजकिय पक्षातील महत्वाच्या नेते मनसेच्या संपर्कात आहेत असेही पानसे म्हणाले.
शहरातील पदाधिकार्यांचे खांदेपालट गणेशोत्सवानंतर होणार होते.ते निवडणूका पार पाडल्यानंतर होईल असेही ते म्हणाले.शहरात काही दिवसांपूर्वीच मनसेचे मराठवाडा संपर्कप्रमुख जावेदखान यांनी गेल्या अाठवड्यात जिल्ह्यातील पदाधिकार्यांशी संवाद साधला होता.व पदाधिकार्यांचे पुर्ननिर्माण करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना सादर केला होता.