नारायण राणे यांच्या दोन्हीही पुत्रांसह भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला

गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र राजकीय समीकरणांमुळे हा प्रवेश अनेकदा पुढे ढकलला गेला. आता अखेर २ ऑक्टोबरला गरवारे हॉलमध्ये संध्याकाळी ४ वाजता राणे भाजपमध्ये होणार आहेत. राणे यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुले नितेश राणे आणि निलेश राणे हेदेखील भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत, अशी माहिती आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी अखेर राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यानिमित्ताने आता थांबली आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.