माजी मुख्यमंत्र्यांवर सुनेने केला कौटुंबिक छळाचा आरोप , केला महिला हेल्पलाइनला फोन !!

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांनी सासू राबडीदेवी यांच्यावर छळ केल्याचा आरोप लावला आहे . ऐश्वर्या आणि यादव कुटुंबियातील वाद आणखी विकोपाला गेला आहे. दरम्यान राबडी देवी यांच्या निवासस्थानी कुटुंबामध्ये जोरदार तू-तू, मैं-मैं झाली. अखेर पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. यावेळी ऐश्वर्याने सासू राबडी देवी आणि नणंद मीसा भारती यांच्यावर कौटुंबिक छळाचा आरोप केल्याचे वृत्त आहे.
यादवपूत्र तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि पालक राबडी देवी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला. ऐश्वर्या यांनी महिला हेल्पलाइनशी संपर्क साधत राबडी देवी आणि नणंद मीसा भारती यांनी आपल्याला घरातून बाहेर काढल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत हेल्पलाइन अधिकारी प्रमिला तपास करण्यासाठी राबडी देवींच्या घरी पोहोचल्या. कौटुंबिक छळ करणे, भोजन न देणे असे आरोप ऐश्वर्या यांनी राबडी देवी आणि मीसा भारती यांच्यावर केले.
दरम्यान, राबडी देवी यांच्या निवासस्थानातून ऐश्वर्या रडत बाहेर पडल्याचा व्हिडिओ अलीकडेच समोर आला होता. यामुळे तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यातील संबंध बिघडल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या प्रकरणी दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.