Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Modi sarkar 2 : एक देश -एक निवडणूक , एक देश -एक भाषा आणि आता अमित शहांनी केली ‘एक देश- एक कार्ड’ ची घोषणा

Spread the love

भाजपच्या महत्वाकांक्षी योजना म्हणजे ‘एक देश , एक निवडणूक’ , ‘एक देश , एक भाषा’ आणि  आता ‘एक देश , एक कार्ड’ ची संकल्पना राबविण्याचा इरादा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केला. देशात होणारी १६ वी जनगणना ही डिजिटल होणार असून अॅपच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. २०२१ ची जनगणना ही १६ वी जनगणना असून ती स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना आहे. १६० वर्षानंतर जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदा अॅपमधून नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे.

‘एक देश , एक कार्ड’ च्या नव्या संकल्पनेनुसार देशातील सर्व नागरिकांना बहुउद्देशीय ओळख पत्र (मल्टिपरपस आयडी कार्ड) देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. यात आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खाते यासारखी सुविधा मिळणार आहे. ही सर्व माहिती एका अॅपमधून गोळा केली जाणार आहे. देशाच्या पहिल्या डिजिटल सेन्ससवर एकूण १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येईल, असेही अमित शहा यांनी सांगितले. इतिहासात पहिल्यांदा अॅपमधून ही जनगणना केली जाणार असून यासाठी घराघरांत जाऊन लोकांच्या मोबाइलमधून ही माहिती गोळा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

देशातील जनगणना ही दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने मार्च महिन्यात दिली होती. सेन्सस २०२१ ची प्री टेस्ट १२ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झाली होती. ती आता या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. जनगणना करण्यासाठी एकूण ३३ लाख लोकांची मदत घेतली जाणार आहे. ही सर्व लोक घराघरांत जाऊन सर्व माहिती गोळा करतील. जनगणना एकून १६ भाषेत केली जाणार आहे. जनगणना करणे हे कंटाळवाने काम नाही. यातून सरकारच्या योजना पोहोचतात. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदनी (एनपीआर) च्या मदतीने सरकारला देशातील समस्यांची माहिती समजण्यासाठी मदत होत असते असे शासनाने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!