Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Arangabad Crime : मोबाईल आणि मंगळसूत्र चोरांना अटक , सातारा आणि मुकुंदवाडी पोलिसांचे यश

Spread the love

औरंंंगाबाद : घराच्या उघड्या खिडकीतून चोराने पाच जणांचे मोबाईल लंपास करणार्‍या चोरट्याला सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.चोरट्याने ४मोबाईल पोलिसांच्या हवाली केले.अशी माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली. ही घटना सातारा परिसरात २८ ऑगस्ट रोजी घडली. सातारा परिसरातील सोनवणे यांच्या घरात संतोष सुर्यकांत अराईकर (वय २०, मुळ रा. समर्थनगर, तळेगाव रोड, इगतपुरी, जि. नाशिक) याच्यासह सचिन संजय लक्कस, उमेश संजय जाधव, महेश यशवंत पाटील आणि निलेश विश्वास नाईकवाडे असे राहतात. २८ ऑगस्ट रोजी त्यांच्या खोलीची खिडकी उघडी होती. हे पाचही जण झोपी गेल्यानंतर चोराने उघड्या खिडकीतून हात घालत त्यांचे मोबाईल लांबविले. त्यावरुन रविवारी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार प्रदीप ससाणे करत आहेत.

महिलेचे मंगळसूत्र हिसकावणारे दोघे गजाआड


औरंगाबादच्या मुकुंदवाडी  परिसरातील ज्ञानेश विद्या मंदिर शाळेजवळून पायी जाणा-या रूपाली रमेश सिरसाट (वय २४, रा.कासलीवाल गार्डन) यांचे मंगळसूत्र हिसकावणा-या दोन चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले. अविनाश गणेश लांडगे (वय १९, रा.संजयनगर, मुकुंदवाडी), विक्की अजय रत्नपारखे (वय १९, रा.रोहिदासनगर, मुकुंदवाडी) अशी मंगळसूत्र चोरट्यांची नावे आहेत. अविनाश लांडगे व विक्की रत्नपारखे यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रूपाली सिरसाट यांचे १५ हजार रूपये किमतीचे  मंगळसूत्र हिसकावले होते. मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक उध्दव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सहाय्यक फौजदार कौतीक गोरे, शेख असलम, कैलास  काकड, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सुनील पवार, मनोहर गिते, संतोष भानुसे, सुधाकर पाटील यांनी मंगळसूत्र चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.


आपलं सरकार

Click to listen highlighted text!