Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आर्थिक संकटामुळे दीडशे वर्षाची ” हि ” कंपनी झाली बंद , २२ हजार कर्मचारी झाले बेरोजगार !!

Spread the love

जगातली सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी अशी ओळख असलेली ‘थॉमस कुक’ रविवारी अचानक बंद करण्यात आली.  या ब्रिटिश कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे कंपनीने हा धाडसी निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे २२ हजार लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी थॉमस कुक कंपनीने  बँकांकडे वाढीव निधी मागितला होता. परंतु, बँकांकडून त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे कंपनीने थेट टाळे लावण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. कंपनी बंद करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता,असे थॉमस कुकने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कंपनी बंद पडल्यामुळे २२ हजार लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. २२ हजार कर्मचाऱ्यांपैकी ९ हजार कर्मचारी हे यूकेमधील आहेत. कंपनीचे ग्राहक, पुरवठादार आणि भागीदार या सगळ्यांवरच याचा परिणाम होणार आहे.

थॉमस कुकचे चीफ एक्झिक्युटिव्ह पीटर फँकहॉजर यांनी या निर्णयाबद्दलल माफी मागितली आहे. थॉमस कुक कंपनीची सगळी बुकिंग्ज रद्द करण्यात आली आहेत. जे पर्यटक थॉमस कुकसोबत टूरवर गेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी यूकेच्या नागरी उड्डाण प्राधिकरणातर्फे प्रयत्न केले जातील. २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या काळात या पर्यटकांना परत आणले जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!