विधानसभेची आचारसंहिता लागताच पदाधिका-यांनी जमा केली वाहने

औरंंंगाबाद : विधानसभा निवडणूकीचे बिगूल अखेर शनिवारी (दि.२१) दुपारी वाजले. विधानसभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषद अध्यक्षा, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांच्यासह विविध विषय समितीच्या सभापतींनी आपली सरकारी वाहने शासनाकडे जमा करण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसापासून विधानसभा निवडणूकीची घोषणा कधी होणार याकडे सर्व इच्छुक उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील २८८, हरियाणामधील ९० आणि झारखंड मधील ८२ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी मतदान होवून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहिर केले. महाराष्ट्रातील २८८ जागा, हरियाणातील ९० जागा आणि झारखंड मधील ८२ जागांसाठी एकाचवेळी मतदान होणार आहे.
वेंâद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूकीची घोषणा करताच शनिवारपासून विधानसभेसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली. विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी पाटील डोणगांवकर, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी यांच्यासह विविध विषय समितीच्या सभापतींनी आपली सरकारी वाहने शासनाकडे जमा केली आहेत.