दाभोलकर -पानसरे खून प्रकारच्या तपासात दिरंगाई , एसआयटी आणि सीबीआयच्या ” या ” उत्तरामुळे कोर्टाने सुनावले खडे बोल

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील तपासासाठी ४ आठवड्यांची मुदत आज तपास करणाऱ्या एसआयटी आणि सीबीआयने मागितली. मुंबई आणि राज्यात पाऊस असल्याने तपास कामात अडथळा आला आणि तपास करता आला नाही असं आज कोर्टात दोन्ही तपास यंत्रणांनी सांगितलं. कोर्टाने याबाबत नाराजी व्यक्त करत सुनावणी चार आठवढ्यासाठी पुढे ढकलली. कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला होता. याप्रकरणी दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
हया दोन्हीही हत्या प्रकरणातील तपासासाठी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. तपास कामासाठी चार आठवढ्याचा वेळ द्यावा अशी मागणी सीबीआय तसेच कोल्हापूरच्या विशेष पथकाने केली. मुंबई आणि राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने तपास कामात अडथळा आल्याने तपास करता आला नाही. असं कोर्टात सांगितलं यावर या प्रकरणात तपास व्यवस्थित होत नसल्याने उच्च न्यायालयात दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांनी याचिका दाखल केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी वापरलेले पिस्तुल कळवा खाडीत टाकण्यात आलं आहे. पिस्तुल शोधण्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून परदेशातील प्रशिक्षित डायव्हर्सची या कामात मदत घेतली जाणार आहे. मात्र मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे पिस्तुल शोधण्यास तपास यंत्रणा अडथळे आले. आता या पिस्तुलाचे अवशेष शोधण्यासाठी ४ आठवड्याचा अवधी द्यावा अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी आज कोर्टात हजर दिली.
कोल्हापुरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे गेल्या दिड महिन्यात कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तपास करण्यासाठी अडथळे आल्याचे एसआयटीतर्फे सांगण्यात आले. यावर उच्च न्यायालयाने एसआयटीवर पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. केवळ दुसऱ्या यंत्रणांनी केलेल्या तपासावर विसंबून राहू नका, तुमच्या कामात निदान थोडीतरी प्रगती दाखवा. अशा शब्दांत हायकोर्टानं खडेबोल सुनावले.