Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदर्भ दौरा रद्द, अतिवृष्टीचा ईशारा

Spread the love

नागपूर हवामान विभागाने विदर्भातील अनेक ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अंदाज व्यक्त केला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या (७ सप्टेंबर) अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, देण्यात आल्याने उद्या होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.

याबरोबरच, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या बरोबरच अकोला, गडचिरोली आणि गोंदिया, वाशीममधील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज आणि उद्या अमरावती, भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!