Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पी. चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी , तिहार तुरुंगात होणार रवानगी

Spread the love

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात जावं लागणार आहे. दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने चिदम्बरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय. यामुळे चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात येणार आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा चिदंबरम यांच्यावर आरोप आहे.

पी. चिदंबरम हे सीबीआयच्या कोठडीत होते. दोन दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर त्यांना आज दिल्लीतील कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सुनावणीत चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडीची मागणी सीबीआयने केली. तर चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सीबीआयच्या या मागणीला विरोध केला. यामुळे कोर्टाने आपला निर्णय काही कालावधीसाठी राखून ठेवला होता. यानंतर पुन्हा झालेल्या सुनावणीत कोर्टाने चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तुरुंगात चिदंबरम यांना झेड दर्जाची सुरक्षा पुवरण्यात येणार आहे. तसंच त्यांना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!