दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन , येत्या ४८ तासात जोरदार पाऊस

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुनरागमन केले आहे. शहरासह उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईसह गोवा आणि कोकणमध्ये येत्या ४८ तासात हवामान विभागाकडून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने परत आगमन केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर राज्यभरात पुढील 48 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात बुधवारी आणि आणि गुरुवारी चांगला पाऊस पडेल, तसेच पावसाची प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातही पुढील 48 तास चांगल्या पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारपासून घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विशेषतः घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, सातारा आणि कोल्हापुरात घाटमाथ्यावर बुधवारी जोरदार पावसाचा इशारा आहे. मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.