पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई , औरंगाबाद , नागपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला राज्याच्या दौऱ्यावर येणार असून दिवसभरात मुंबई, नागपूर आणि औरंगाबादला त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन होणार आहे. सध्या महाराष्ट्रात जे राजकीय वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष मोदींच्या दौऱ्याकडे लागलं आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून काही दिग्गज पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजमध्ये प्रवेश करू शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे विरोधीपक्षांवरचा दबावही आणखी वाढलाय.
पंतप्रधान मोदी सकाळी ७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता मुंबईत येणार आहेत. त्यानंतर २ वाजता औरंगाबाद आणि सायंकाळी ५ वाजता नागपूरमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. नागपूरमध्ये मेट्रोच्या ब्रॉड ग्रेड कोचेसच्या कारखाण्याचा भूमिपूजन समारंभ असून जाहीर सभाही होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर आल्या असून आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. १३ सप्टेंबरच्या सुमारास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असून त्या आधी पंतप्रधानांचा दौरा होत असल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालंय.