कलम ३७० प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी शहा यांना दिले तत्काळ उत्तर, माध्यमांशी बोलताना शहा हे खोटं बोलत असल्याचा दावा

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याविरोधात मी मतदानचं केलं नाही. संसदेचं रेकॉर्ड सुद्धा तुम्ही पाहू शकता. देशाचे गृहमंत्री अमित शहाधांदात खोटं बोलत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सोलापूर येथे भाजपच्या जाहीर सभेत अमित शहा यांनी ३७० कलमावरून काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्ला करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या विरोधात मतदान केल्याचा दावा केला होता. शहा यांची सभा संपताच सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना शहा हे खोटं बोलत असल्याचा दावा केला. मी ३७० कलमच्या मतदान प्रक्रियेत भागच घेतला नव्हता. कुणीही संसेदचं रेकॉर्ड पाहू शकतात. शहा खोटं बोलत आहेत, असं सुळे यांनी सांगितलं. त्यामुळे ३७० कलमवरून आगामी काळात शहा आणि राष्ट्रवादी असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.