ताजी बातमी : काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाचा गुंता सुटेना, राहुल गांधी कार्यमुक्त, सोनिया हंगामी अध्यक्ष

राष्ट्रीय कार्यकारिणीत दिवसभर काथ्याकुट करूनही काँग्रेसला नवा अध्यक्ष सापडू शकलेला नाही. अखेर अध्यक्षपदाची प्रक्रिया लांबवणीवर टाकत माजी अध्यक्षा यांच्याकडे काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज राष्ट्रीय कार्यकारिची बैठक बोलावण्यात आली होती. आज दोन सत्रांमध्ये ही बैठक झाली. सकाळी बैठकीच्या सुरुवातीला सोनिया गांधी व राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते. मात्र, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत आम्ही सहभागी होणार नाही, असे सांगत दोघेही बैठकीतून निघून गेले. त्यानंतर नेत्यांचे क्षेत्रवार गट तयार करून चर्चा करण्यात आली. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. रात्री ८ वाजता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा बैठक झाली व त्यात पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सोनियांकडे सोपवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.