Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, तीन दिवस आॅब्जर्वेशनवर : वैद्यकीय सूत्र

Spread the love

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती आता स्थिर आहे व ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. व्यंकय्या नायडू यांनी आज एम्समध्ये जाऊन अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी नायडू यांनी जेटलींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनही माहिती घेतली.
जेटली यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, असे आपणास डॉक्टरांनी सांगितल्याचे नायडू यांनी नमूद केले आहे. नायडू यांनी यावेळी जेटली यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला.
दरम्यान, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व अशक्तपणामुळे अरुण जेटली यांना शुक्रवारी सकाळी १० वाजता दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी रात्रीच एम्समध्ये जाऊन जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!