पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला करतील संबोधित

Prime Minister Narendra Modi's address to the nation will be a television broadcast and will be played out at 8 PM. https://t.co/QtwKLfnOCX
— ANI (@ANI) August 8, 2019
जम्मू-कश्मीरच्या कलम 370 हटविण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले मौन सोडणार आहेत. आज रात्री 8 वाजता ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) वरुन किंवा टेलिव्हिजनवरुन ते देशाला संबोधित करणार आहे. 7 ऑगस्टला मोदी या मुद्यावर देशाला संबोधित करणार होते. मात्र भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या दु:खद निधनामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. आणि त्यापुढे त्यांना हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला. याआधी 27 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते.
हा आठवड्यात ऐतिहासिक निर्णय झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या जम्मू-कश्मीर मुद्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटवून एक नवा इतिहास घडवला. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोलतील किंवा काय बोलतील यावर सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची निधनाची बातमी ऐकताच हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता .