Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न प्रदान

Spread the love

माजी राष्ट्रपती यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ” प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी सन्मानाचे वितरण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी या पुरस्कारांची घोषणा केली होती.

राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री, नेते आणि मान्यवर उपस्थित होते. भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, थोर समाजसेवक चंडिकादास अमृतराव देशमुख तथा आणि ज्येष्ठ संगीतकार यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला होता. भूपेन हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका यांनी हा सर्वोच्च नागरी सन्मान स्वीकारला. तर, दीनदयाल संशोधन संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांनी नानाजी देशमुख यांना जाहीर झालेला भारतरत्न स्वीकारला. प्रणव मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रपती म्हणून भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारे प्रणव मुखर्जी पाचवे व्यक्ती आहेत. याआधी, डॉ. एस. राधाकृष्णन, राजेंद्र प्रसादर, झाकीर हुसैन आणि व्ही. व्ही. गिरी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले होते. पश्चिम बंगालमधील वीरभूम येथे जन्म झालेल्या ८३ वर्षीय प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती होण्यापूर्वी यूपीए सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वांच्या पदावर काम केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांची कारकीर्द मोठी आहे. काँग्रेसप्रणित केंद्र सरकारमध्ये मुखर्जी यांनी अर्थ, संरक्षण, परराष्ट्र यांसारख्या मंत्रालयाचा पदभार यशस्वीपणे सांभाळला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!