मुंबई सामुहिक बलात्कार प्रकरणी अद्याप एकही अटक नाही – मीना

औरंगाबाद – मुंबईत तीन आठवड्यापूर्वी चेंबूर परिसरात जालन्याच्या युवतीवर झालेल्या गॅंगरेप प्रकरणातअद्याप चुनाभट्टी पोलिसांना एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. अशी कबुली झोन ६ चे पोलिसउपायुक्त शशी मीना यांनी सांगितले.
यापार्श्र्वभूमीवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो चुनाभट्टी पोलिस ठाणे चेंबुर मुंबई येथे वर्ग करण्यात आला. चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस निरीक्षक शिर्के यांनी सांगितले की, पिडीता ही अद्यापही बोलण्याच्या देहस्थितीत नाही. व तपास सुरु आहे.