६२ वा अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा, औरंगाबाद पोलिसांनी पटकावले एक सुवर्ण तीन रजत पदके, महाराष्ट्र पोलीस अग्रेसर

गेल्या १६ते २० जुलै दरम्यान लखनौ यैथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र पोलिसांनी ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कास्य पदके पटकावून कर्तव्य मेळाव्यात अव्वल स्थान राखले तर औरंगाबाद पोलिसांनी १ सुवर्ण आणि ३ रजत पदके पटकावली. पोलिस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांनी यांनी महाराष्ट्र पोलिस संघाचा जाहिर सत्कार केला.
या कर्तव्य मेळाव्यात सहा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यात सायंटिफिक अॅड टू इंव्हिस्टेगेशन, फोटोग्राफी, व्हाडीओग्राफी, संगणक माहिती , घातपात विरोधी तपासणी आणि श्वान पथक स्पर्धा यांचा समावेश होता. या स्पर्धेमधे तीस राज्यातील १२५० पोलिस सहभागी झाले हौते. केंद्रीय पोलिस दल आणि निमलष्करी दलांचाही यात समावेश होता.
औरंगाबादचे सायबर पोलिस ठाण्याचे एपीआय राहूल खटावकर यांना १ सुवर्ण आणि ३ रजत पदके मिळाली. सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले मन्सूर इब्राहिम शहा यांनी महाराष्ट्र पोलिस संघाला आॅब्झरव्हेशन टेस्ट या स्पर्धेत तीन सुवर्ण पदके प्राप्त करुन दिली. ते स्वता: २०१६ सालचे गोल्डमेडलिस्ट आहेत.व त्यांना या स्पर्धेत मार्गदर्शक म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली तर श्वान दलाचे हॅंडलर अतुल मोरे व सुभाष गोरे यांनी नार्कोटिक या स्पर्धेत चांगली कामगिरी पार पाडली. या विजयाची दखल घेत महाराष्ट्र पोलिस संघाचा पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल आणि गुन्हे अन्वेषण विभागाचेअप्पर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी जाहिर सत्कार केला. या यशाबद्दल पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी औरंगाबाद पोलिस संघाचे कौतूक केले.