धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर पवार- सोनियांच्या उपस्थितीत पंढरपुरात अधिवेशन

मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटल्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने जोर पकडलाय. आरक्षण देण्याची घोषणा भाजपने आपल्या जाहीरनाम्यात केली होती तसच सत्तेवर येताच निर्णय घेऊ असं आश्वासनही दिलं होतं. त्यामुळे त्या आश्वासनाचं काय झालं याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या प्रश्नावर होणाऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत.
पाच वर्षापूर्वी धनगर आरक्षणाची सुरूवात पंढरपूरातून झाली होती. यानंतरच बारामतीला मोठ आंदोलन उभ राहिलं. तरीही आरक्षणाचा प्रश्न हा सुटू शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाने पंढरपूरात दोन लाख धनगर समाजाच्या उपस्थितीत आरक्षण मेळावा आयोजित केलाय. या मेळाव्यासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि आमदार रामहरी रूपनर यांनी दिली.