Aurangabad : संग्राम नगर रेल्वे ट्रॅक डेथ पॉईंट आणि आत्महत्या करणाऱ्यांना वाचणारा देवदूत !!

औरंगाबाद शहरातील संग्राम नगर रेल्वे ट्रॅक म्हणजे निराश लोकांसाठी डेथ पॉईंट झाला आहे . पण या स्पॉटवर आजपर्यंत अनेकांचे प्राण वाचविणारे श्रीमंत गोर्डे पाटील म्हणजे जणू देवदूत झाले आहेत . आजही त्याचीच प्रचिती आली . त्याचे झाले असे कि , शरीराने लठ्ठ असल्याने लहान आणि मोठा भाऊ खिल्ली उडवतात म्हणून एका १९ वर्षीय तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे येण्याअगोदर विशेष पोलीस अधिकारी देवदूताच्या रुपात आल्याने तरूणाचे प्राण थोडक्यात बचावले. तरुणाला समज देऊन त्याला आई-वडिलांना स्वाधीन करण्यात आले. अतुल शिवाजी बोंद्रे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. रविवारी दुपारी ही घटना औरंगाबाद शहरातील संग्रामनगर उड्डाणपुलाखाली घडली.
अतुल हा हातात पिशवी घेऊन संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर बसला होता. त्याचवेळी अनेक जण त्याच्या आजूबाजूने जात होते. मात्र, कोणीही त्यास हटकले नाही. त्याचदरम्यान विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोरडे आणि त्यांच्या सहकऱ्यांनी अतुसचे निरीक्षण करत होते. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होती. तो निराश दिसत होता. त्याचवेळी अतुल बसलेल्या रुळावर रेल्वे येत होती. हे पाहून श्रीमंत गोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतुलच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी अतुल रेल्वे रुळावरून उठवले. त्याला धीर दिला. त्याला विचारणा केली असता त्यांच्याकडे त्याने आपले दु:ख शेअर केले. सख्खे दोन भाऊ लठ्ठ म्हणून खिल्ली उडवतात. झोपूही देत नाही, यामुळे आपण आत्महत्या करण्याच्या विचाराने रेल्वे रुळावर बसलो होतो, असे अतुलने सांगितले. अतुलला समज देऊन त्याला जवाहर नगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथेही पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. नंतर त्याला आई-वडिलांना स्वाधीन करण्यात आले.
विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी आज पर्यंत अनेक लोकांचे प्राण वाचविले आहेत . संग्राम नगर रेल्वे ट्रॅक जणू निराश लोकांचा देठ पॉईंट आहे आणि श्रीमंत पाटील त्यांना पुंन्हा जीवनाकडे घेऊन जाणारे देवदूत !!