Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ज्या कामांसाठी आम्ही खासदार झालो, ती कामं आम्ही प्रामाणिकपणे करू, खा . साध्वी प्रज्ञा यांनी उडविली स्वच्छ भारताची खिल्ली !!

Advertisements
Advertisements
Spread the love

बेताल वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आणखी एक धक्कादायक विधान केलं आहे. नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार बनले नाही, असं बेलगाम वक्तव्य करत साध्वी प्रज्ञासिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. साध्वी यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisements

सीहोर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात जनतेशी संवाद साधताना साध्वी प्रज्ञा यांनी हे वक्तव्य केलं. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. लक्षात ठेवा, आम्ही नाले स्वच्छ करण्यासाठी खासदार झालेलो नाहीत. आम्ही शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्या कामांसाठी आम्ही खासदार झालो, ती कामं आम्ही प्रामाणिकपणे करू, असं साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!