Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दोन महिन्याच्या रजेचा धोनीचा निर्णय , सैनिकांसोबत घालवणार सुटी , वेस्ट इंडीज दौऱ्यात जाणार नाही

Spread the love

भारताच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश नसणार आहे. खुद्द धोनीनेच हे स्पष्ट केले आहे. या वृत्तामुळे भारताचा हा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज या पुढे खेळणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर आहे. पुढील २ महिन्यांसाठी धोनी या रेजिमेंटला वेळ देणार असल्याचे वृत्त आहे. आपण वेस्ट इंडीजला जाणार नसून पुढील दोन महिने रेजिमेंटसोबत घालवणार आहोत असे धोनीने स्वत: सांगितल्याचे एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही स्पष्ट केले आहे.

धोनीने आपला हा निर्णय बीसीसीआयलाही कळवला आहे. रविवारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!