Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“गेम ” खेळण्यासाठी म्हणून बापाने मोबाईल मुलाच्या हातात दिला आणि बापाचाच ” गेम ” झाला !!

Spread the love

हल्लीच्या काळात मुले आणि मोबाईलचे नाते अतूट झाले आहे. बऱ्याचदा मुलांच्या हातात आईचे किंवा बाबांचे फोन असतात . हे मोबाईल कधी आई बाप स्वतःहून देतात तर कधी मुले स्वतःच हट्टाने मोबाईल मिळवतात .  बंगळुरुमध्ये राहणाऱ्या एका ४३ वर्षीय व्यक्तीने सुद्धा याच हेतूने आपला मोबाइल मुलाला खेळण्यासाठी म्हणून दिला होता. १४ वर्षीय मुलगा मोबाइलच्या गेममध्ये गुंतून राहिल असे त्याला वाटले होते. पण घडले उलटेच. बाणाशंकरी येथे हे कुटुंब राहते.

या मुलाने मोबाइलमधून वडिलांचेच विवाहबाह्य संबंध शोधून काढले. नागाराजूचे एक महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. मोबाइलमधले प्रेयसीसोबतचे ऑडिओ रेकॉर्डिंग मुलाच्या हाती लागले. ही गोष्ट त्याने आईच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे मोबाइल मुलाच्या हातात देण्याचा निर्णय नागाराजूला चांगलाच महाग पडला असून १५ वर्षाचा संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.

सदर व्यक्तीच्या पत्नीने आता नवऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसात धाव घेतली आहे. नवऱ्याने मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. पत्नी शाळेत शिक्षिका आहे. ११ जुलैला नागाराजूने त्याचा मोबाइल फोन मुलाला खेळण्यासाठी दिला होता. खेळता खेळता मुलाने फोन रेकॉर्डर आणि व्हॉट्स अॅप चॅट ओपन केला. त्यावेळी त्याला वडिलांचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचे कळले.

वडील आणि संबंधित महिलेमध्ये झालेले अश्लील संवादाचे मेसेजेस त्याने पाहिले. त्याने लगेच आईला ते सर्व मेसेज दाखवले. जेव्हा पत्नीने नागाराजूला याबद्दल जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. याबद्दल कुटुंबीयांकडे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी नागाराजूने धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!