Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Chandrayan २ : आता सोमवारी दुपारी अवकाशात झेपावणार

Spread the love

तांत्रिक कारणामुळं ऐनवेळी उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या चांद्रयान-२च्या प्रक्षेपणाचा दिवस आणि वेळ अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी २२ जुलैला भारतीय दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’नं ट्विटरद्वारे दिली. चंद्रावर उतरणाऱ्या पहिल्या भारतीय यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर उपस्थित होते. देशभरातून आलेल्या शेकडो नागरिकांनी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनीही या वेळी गर्दी केली होती. उड्डाणाला ५६ मिनिटे आणि २४ सेकंद राहिले असताना अचानक ‘काउंटडाउन’ थांबवण्यात आले. थोड्याच वेळात ‘चांद्रयान-२’चे सोमवारचे उड्डाण रद्द करण्यात येत असल्याची घोषणा नियंत्रण कक्षामधून करण्यात आली. ‘इस्रो’ने अधिकृत पत्रक काढून काउंटडाउनदरम्यान रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड दिसल्यामुळे सावधानता बाळगून आजचे उड्डाण स्थगित करण्यात येत आहे. प्रक्षेपणाची नवी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. अखेर आज इस्रोने चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर केली असून, येत्या सोमवारी, २२ जुलैला दुपारी २.४३ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!