Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जवाहरलाल नेहरू पर्वत तर नरेंद्र मोदी केवळ त्याचा एक हिस्सा : एमडीएमकेचे प्रमुख खा. वायको

Spread the love

तामिळनाडूतील मरुमलारची द्रविड़ मुनेत्र कळघम (एमडीएमके) चे प्रमुख  व राज्यसभा खासदार वायको यांनी जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करताना म्हटले कि , जवाहरलाल नेहरू एक महान लोकशाहीवादी होते . त्यांनी क्वचितच कधीतरी संसदेचे सत्र सोडले असेल तर नरेंद्र मोदी मात्र  कधीतरीच  संसदेच्या सत्रात सहभाग नोंदवतात.  मोदी आणि नेहरू यांची तुलना करायची झाली तर म्हणता येईल कि , जवाहरलाल नेहरू पर्वत होते तर नरेंद्र मोदी केवळ त्याचा एक हिस्सा आहेत.

संसदेत हिंदी भाषेत केल्या जाणाऱ्या भाषणांमुळे संसदेतील चर्चेचा स्तर खालावला असल्याचे सांगत, त्यांनी हे देखील विचारले की हिंदीत कोणते साहित्य आहे? तिची काहीच पाळमुळ नाहीत. तर संस्कृत एक मृत भाषा असल्याचेही ते म्हणाले. तसेच  पूर्वी संसदेत विविध विषयांचे सखोल ज्ञान असलेल्यांना पाठवले जात होते. मात्र आज संसदेतील चर्चांची पातळी हिंदीमुळे खालवली आहे. ते केवळ हिंदीत आरडाओरडी करतात. एवढेच नाहीतर पंतप्रधान मोदी देखील हिंदीतच भाषण करतात, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानांमुळे खळबळ उडाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!