कुमारस्वामी सरकारची १८ जुलैला अग्नी परीक्षा , बंडखोर आमदारांचा फैसला १६ जुलैला

Bengaluru: Outgoing Karnataka Chief Minister Siddaramaiah and JD(S) President HD Kumaraswamy address the media after a meeting with Governor Rudabhai Vala in relation with in Bengaluru on Tuesday. (PTI Photo/Shailendra Bhojak) (PTI5_15_2018_000169B)
कर्नाटकमध्ये अजूनही वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडतायत आणि सरकारवरची टांगती तलवारही कायम आहे. एकीकडे बंडखोर आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही तर दुसरीकडे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भाजप विश्वासदर्शक ठरावामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतं आहे.
याच घडामोडींमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामैया यांनी विधानसभा अध्यक्ष रमेश यांच्याशी चर्चा केली. आता कुमारस्वामी सरकारला १८ जुलैला म्हणजे गुरुवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे.भाजपने कुमारस्वामी यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती.सिद्धरामय्या जर बहुमत सिद्ध करू शकले तर सरकारवरचा धोका टळू शकतो. पण यात अपयश आलं तर बी. एस.येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार बनू शकतं.
बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध करावं, अशी त्यांची मागणी होती. बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर याबद्दल निर्णय घेऊ, असं रमेश कुमार यांनी त्यांना सांगितलं होतं. १६ बंडखोर आमदारांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टात १६ जुलैला, मंगळवारी सुनावणी आहे.भाजपचे आमदार सुरेश कुमार यांच्या मते, पहिल्यांदा कुमारस्वामी सरकारने बहुमत चाचणीमध्ये संख्याबळ सिद्ध करून दाखवावं. त्यानंतरच दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष वळवता येईल. आमच्यासोबत १०५ आमदार आहेत,असा दावाही त्यांनी केला.