Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मॉब लिंचिंगवरून बसपा नेत्या मायावती यांची केंद्र सरकारवर टीका

Spread the love

बसपा प्रमुख मायावती यांनी ट्विट करून मॉब लिंचिंगवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मॉब लिंचिंग हा भयानक आजार असून पोलिसही त्याचे बळी ठरले आहेत, असं सांगतानाच मॉब लिंचिंग रोखण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका मायावती यांनी केली आहे. 


सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर केंद्र सरकारने मॉब लिंचिंगची गंभीरपणे दखल घेऊन या घटना रोखण्यासाठी वेगळा देशव्यापी कायदा बनवायला हवा होता. मात्र लोकपाल कायद्याप्रमाणेच मॉब लिंचिंगवरही केंद्र सरकार उदासीन आहे. त्यामुळे इच्छाशक्ती नसलेलं हे सरकार असल्याचं सिद्ध होत आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील विधी आयोगानं उचलेलं पाऊल योग्यच असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. मॉब लिंचिंग देशभरात भयानक आजाराच्या रुपाने फैलावण्यास भाजप कारणीभूत आहे. कायद्याचं राज्य प्रस्थापित न करणं ही भाजपच्या नियत आणि नीतीची देण आहे. त्याला केवळ दलित, आदिवासी आणि धार्मिक अल्पसख्यांकच नव्हे तर सर्व समाजातील लोक आणि पोलीसही बळी पडले आहेत, असं ट्विट मायावती यांनी केलंय. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही मॉब लिंचिंगवर प्रतिक्रिया दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!