Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वांद्रे-वरळी सी-लिंकवर आत्महत्या करणाऱ्या तरुणाच मृतदेह सापडला

Advertisements
Advertisements
Spread the love

वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका तरुणाने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी सव्वा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. पार्थ सोमाणी (२५) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण टॅक्सीने प्रवास करत वांद्रे-वरळी सी-लिंकवर आला. त्याने टॅक्सी थांबवण्यास सांगितली आणि समुद्रात उडी घेतली. तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सायंकाळी उशिरापर्यंत या तरुणाचा समुद्रात शोध घेत होते. रात्री उशिरा या तरुणाचा मृतदेह सापडला. पार्थ एका सीए फर्ममध्ये नोकरी करत होता. तो मुलुंड येथील रहिवासी आहे. तो दुपारी वरळीकडून वांद्र्च्या दिशेने टॅक्सीने जात होता. अचानक त्याने मध्ये टॅक्सी थांबवायला सांगितली आणि टॅक्सीतून उतरत समुद्रात उडी घेतली.

Advertisements

तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘ओहोटी असल्याने शोध घेणे फार अवघड नाही,’ असे समुद्री शोध व बचाव केंद्राचे प्रमुख कमांडर टी आशिष यांनी सांगितले. मात्र तटरक्षक दलाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. सायंकाळी ६.१५ वाजता सूर्यास्त होत असल्याने शोध थांबवण्यात आला. मात्र रात्री उशिरा वांद्रे येथील बँड स्टॅंड येथे किनारपट्टीवर या तरुणाचा मृतदेह वाहत आला. पोलिसांना तो ताब्यात घेऊन ओळख पटवली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!