Bad News : गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने स्वीकारला आत्महत्येचा मार्ग , ७ महिन्याची चिमुरडी मात्र वाचली !!

गरिबी असल्याकारणाने कुटुंबातील प्रमुख सदस्याने गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या करत आपल्या जीवनाचा प्रवास संपवला. जव्हार येथे हृदय हेलावणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. घरातील प्रमुख माणसाने आत्महत्या केल्याने संपुर्ण कुटुंबाचा आधार गेला. कुटुंबाचा आधार गेल्याने स्वतः सह आपल्या दोन लहान मुलींना कसे सांभाळायचे, असा प्रश्न कुटुंबातील मुख्य सदस्याचा आधार हरपल्यानंतर रुक्षणा पडला होता. याचा विचार करत असताना कोणताही मार्ग पुढे न सापडल्याने ३ वर्षाची मुलगी दीपाली आणि ७ महिन्यांची वृषाली या दोघांना विष देऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. परंतु या घटनेमध्ये ७ महिन्यांच्या चिमुरडी वृषालीचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
शुक्रवारी, ५ जुलै रोजी तीस वर्षीय रूक्षणा यांनी स्वतःसह दोन्ही मुलींना विष पाजल्याची माहिती त्याची आई क्ष्मी अमृत टोकरे यांनी दिली होती. या घडलेल्या धक्कादायक घटनेमध्ये रुक्षणा यांचा प्राण गेला असून त्यांची मोठी मुलगी दीपालीचा मृत्यू झाला आहे. ७ महिन्यांच्या चिमुरडी वृषालीचा जीव वाचवण्यास यश आले असले तरी सध्या ही चिमुरडी जव्हार कुटीर रुग्णालयात मृत्यूशी आपला लढा देत असल्याचे समजते आहे. दरम्यान, या अत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व यंत्रणांच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशाप्रकारची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.