Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 : पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर , न्यूझीलंडचा सेमी फायनल मध्ये प्रवेश !!

Advertisements
Advertisements
Spread the love

आजचा सामना पाकिस्तानने जिंकला तरीही बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्याने  न्यूझीलंडचे  सेमीफायनलचे  स्थान पक्के  झाले आहे. सामना पाकिस्तानने जिंकला तरीही  त्यांचे आणि न्यूझीलंडचे समान ११ गुण होतील. मात्र, धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड वरचढ ठरल्याने पाकचे आव्हान संपुष्टात येत  आहे. न्यूझीलंडने ९ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना तीन सामने गमवावे लागले तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे त्यांचे ११ गुण झाले असून ते गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहेत.

Advertisements

ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी सेमिफायनलला स्थान पक्कं केलं आहे.त्यांनी इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचा पराभव करून गुणतक्त्यात १४ गुणांसह पहिलं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारतानं सेमीफायनलला धडक मारली. सध्या गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताने ६ सामने जिंकले आहेत. भारताचा एका सामन्यात पराभव झाला तर एक सामना पावसाने रद्द झाला. भारताचे १३ गुण झाले असून पुढचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. यात विजय मिळवल्यास भारताचे १५ गुण होतील. तर पराभव झाला तर भारत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्यामुळे पुन्हा भारत आणि इंग्लंड अशी लढत होईल.

Advertisements
Advertisements

२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाचे आव्हान अखेरीस संपुष्टात आले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारत बांगलादेशला ३१६ धावांचे  आव्हान दिले खरे मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशला ७ धावांच्या आत सर्वबाद करणे  गरजेचे होते.  हे अशक्यप्राय आव्हान पाकिस्तानी गोलंदाज पूर्ण करु शकले नाहीत. फिरकीपटू मोहम्मद हाफिजने पहिलं षटक निर्धाव टाकत चांगली सुरुवात केली. मात्र मोहम्मद आमिरच्या दुसऱ्याच षटकात बांगलादेशी सलामीवीरांनी ७ धावा काढत पाकिस्तानला स्पर्धेबाहेर ढकलले आहे.

पाकिस्तानला आपले आव्हान कायम टिकवण्यासाठी किमान ३०८ धावा करणे  गरजेचे होते . इमाम उल-हक, बाबर आझम आणि इमाद वासिम या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फखार झमान मोहम्मद सैफुद्दीनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर इमाम उल-हक आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला. इमाम उल-हकने १०० चेंडूत १०० धावा झळकावत संघाचा डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावसी. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी १५७ धावांची भागीदारी केली. सैफुद्दीनने बाबर आझमला माघारी धाडत पाकिस्तानची जमलेली जोडी फोडली. अवघ्या ४ धावांनी बाबर आझमचं शतक हुकलं. यानंतर शतकवीर इमाम उल-हकही हिट विकेट होऊन माघारी परतला. मोहम्मद हाफीज, हारिस सोहेल हे फलंदाजही झटपट माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत इमाद वासिमने ४३ धावांची फटकेबाजी करत पाकिस्तानला ३१५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रेहमानने ५, मोहम्मद सैफुद्दीनने ३ तर मेहदी हसनने १ बळी घेतला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!