अतिवृष्टीमुळे उद्धभवलेल्या घटनांसाठी सरकारला जबाबदार धरीत विरोधकांकडून विधानसभेत गदारोळ

मुंबईतल्या अतिवृष्टीमुळे उद्धभवलेल्या घटनांसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच पाणी तुंबण्याच्या घटनेला महापालिकेला आणि सरकारला जबाबदार धरलं आहे. गदारोळानंतर १२ वाजेपर्यंत विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आल्यावर निवेदन देतील आणि कामकाज सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
मुंबईत झालेल्या पावसामुळे सगळ्या व्यवस्थेचा बोजवरा उडाला आहे. मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरच्या ट्रेन्स फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहेत. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरही ट्रेन्स उशिराने सुरू आहेत. मुंबई, मुंबई उपनगरे आणि ठाण्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहनही करण्यात आले आहे. या सगळ्या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे असं विरोधकांनी म्हणत गदारोळ घातला. त्यानंतर विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.