Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अधिकाऱ्याला मारणारा “बॅट मॅन” आमदार आकाश विजयवर्गीयला जमीन मिळताच समर्थकांनी केला हवेत गोळीबार !!

Advertisements
Advertisements
Spread the love

महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना शनिवारीच जामीन मंजुर झाला होता, पण रविवारी त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. स्थानीक तुरूंग प्रशासनाला न्यायालयाचे आदेश वेळेवर न मिळाल्याने आकाश विजयवर्गीय यांना चौथी रात्रही तुरूंगातच काढावी लागली. आज सकाळी १० वाजता तुरंगातून त्यांची सूटका करण्यात येणार होती, कार्यकर्त्यांनी यासाठी खास योजनाही बनवली होती. पण कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तुरूंग आणि जिल्हा प्रशासनाने आकाश यांची तुरूंगातून ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर सुटका केली.

Advertisements

दरम्यान, आकाश यांना जामीन मंजुर झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्यांचे समर्थक खुलेआम गोळीबार करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला. यावेळी विजयवर्गीय यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली. शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजुर केल्याचं समजताच विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी एक जण हातात बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत होता. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. इंदूर महापालिकेचे अधिकारी धिरेंद्र बायस यांना बॅटने मारहाण केल्यामुळे आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. शनिवारी भोपाळच्या विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!