Aurangabad : एका आत्महत्येसह विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

औरंंंगाबाद शहराच्या विविध भागांमध्ये घडलेल्या घटनांमध्ये तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिन्ही घटनांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा परिसरातील एकतानगर येथे राहणारे राहुल शामराव जगधने (वय २६) यांना २९ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानकपणे रक्ताच्या उलट्या झाल्या. उलट्या झाल्याने जगधने हे बेशुध्द झाले होते. त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत, वाळुज परिसरातील बजाजनगर येथे राहणारे अरूण सुखदेवराव अवसरमोल (वय ५८) हे २८ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घराचा जीना उतरत होते. त्यावेळी अचानकपणे चक्कर येवून खाली पडल्याने अवसरमोल हे बेशुध्द झाले होते. अवसरमोल यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत, रितेश सुभाष देशपांडे (वय २८, रा.क्रांतीनगर, हर्सुल) हे २८ जून रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास हर्सुल टी पॉईन्ट चौकातून हर्सुल गावाकडे जात होते. हर्सुल गावाजवळील वळू संगोपन वेंâद्राजवळ त्यांच्या दुचाकीस अपघात होवून ते गंभीर जखमी झाले. रितेश देशपांडे यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रमानगरात गळफास घेवून युवकाची आत्महत्या
औरंंंगाबाद : उस्मानपुरा परिसरातील रमानगर येथे राहणाऱ्या किशोर रमेश दाभाडे (वय ४५) या युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना २९ जून रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. किशोर दाभाडे याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला होता. किशोर दाभाडे याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.