Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mob Lynching : झारखंड घटना मानवतेला कलंक तर भाजपचे मौन धक्कादायक : राहुल

Spread the love

झारखंड मध्ये झालेल्या झुंडबळीच्या (मॉब लिंचींग) घटनेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मानवतेवर कलंक म्हटले आहे. झारखंड आणि केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपने या गंभीर घटनेवर चकार शब्द काढलेला नाही. याचा जाब राहुल यांनी भाजप सरकारला विचारला आहे. चोरीच्या आरोपाखाली ” जय श्रीराम ” आणि ” जय हनुमान ” बोलण्यास भाग पडून जमावाने तबरेज अन्सारी नामक युवकाची बेदम मारहाण करत त्याची हत्या केली होती. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे तर दोन पोलिसांना निलंबित केले आहे. काँग्रेसचे मृत अन्सारीच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

या घटनेशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. काही लोक पीडित युवकास ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ बोलण्यास भाग पाडत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. तबरेजच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी विशेष तसाप समितीची स्थापना केली आहे.

सरायकेला खरसावांचे पोलीस अधीक्षक कार्तिक एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी अन्सारी आणि दोन अन्य चोरीच्या उद्देशाने रात्री सरायकेला गावच्या एका घरात घुसले. घरातले लोक जागे झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि चोरी करणाऱ्या अन्सारीला जमावाने पकडलं. त्याचा साथीदार फरार झाला. रात्री अन्सारीला गावकऱ्यांनी खांबाला बांधून बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तबरेजला अटक केली. त्याला रुग्णालयात दाखल केले, पण तिथे त्याचा मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!